Surabhi Jayashree Jagdish
सफरचंदाला आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट फळ मानलं जातं, हे शरीराला अनेक फायदे देते.
यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अनेक पोषक तत्त्वे असतात.
सफरचंद खाल्ल्याने अनेक समस्या दूर राहतात, पण सफरचंद खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्या तर त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. यामुळे कफाची समस्या होऊ शकते आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
सफरचंद आणि दही दोन्हींची तासीर थंड असते. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच दही खाल्ल्यास शरीरात कफ अधिक प्रमाणात वाढू शकतो.
याशिवाय सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण यामुळे पोटात अॅसिड वाढू शकतो, पचनासंबंधी अडचणी, आतड्यांमध्ये सूज आणि अपचनाची समस्या होऊ शकते.
सफरचंद खाल्ल्यानंतर कधीही मुळा खाऊ नये कारण मुळ्याची तासीर देखील थंड असते आणि त्यामुळे कफ व पचनाशी संबंधित अडचणी उद्भवू शकतात.
सफरचंद खाल्ल्यानंतर आंबट फळे आणि लोणचंही खाऊ नये कारण त्यामुळे पोटात सिट्रिक अॅसिड वाढू शकतो आणि पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात.