ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सकाळी रिकाम्या पोटी कॅफीनयुक्त पेय जसे की कॅाफीचे सेवन करु नये. तसेच चहा सुद्धा पिऊ नये. यामुळे अपचन आणि अॅसिडीटीचा त्रास होतो.
रिकाम्या पोटी थंड पेय जसे की कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूस पिणे टाळावे यामुळे पोट फुगणे आणि अॅसिडिटी सारखे त्रास होतात.
अनेकांना नाश्त्यामध्ये तळलेली आणि मसालेदार पदार्थ खायला आवडतं. परंतु तळलेली आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने जळजळ आणि अॅसिडीटीचा त्रास होतो.
रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री, लिंबू यांचे सेवन करु नये. यामुळे पचनाची समस्या होऊ शकते.
सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते.
कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यास गॅस आणि पोट फुगण्याची समस्या होते.
रिकाम्या पोटी मद्यप्राशन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.यामुळे पोटाची आणि यकृताची समस्या होऊ शकते.
रिकाम्या पोटी नेहमी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरते. तसेच तुम्ही हर्बल टी पिऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: 'या' लोकांसाठी कॅाफीचे सेवन ठरेल घातक