Tanvi Pol
एका भांड्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा.
त्यात १० ते १२ ताजी तुळशीची पाने घाला.
नंतर १ इंच अद्रक किसून त्यात टाका.
हवं असल्यास २-३ काळी मिरीही घालू शकता.
मिश्रण ५-७ मिनिटे उकळा आणि गॅस बंद करा.
काढा गाळा आणि त्यात थोडं मध घाला.
गरम गरम काढा हळूहळू प्या; सर्दी, खोकला कमी होईल.