Shruti Vilas Kadam
अवनीत कौरने दिवाळीच्या निमित्ताने निळ्या रंगाचा आकर्षक लहेंगा परिधान केला आहे. या लहेंग्यावर सोन्याच्या धाग्यांनी केलेली नाजूक कोरकाम (embroidery) अतिशय उठून दिसते.
हा लहेंगा लूक पारंपरिक असला तरी त्यात राजेशाही झळाळी दिसून येते. अवनीतचा हा अंदाज सणासुदीच्या काळातील फॅशनसाठी उत्तम प्रेरणा ठरतो.
अवनीतचा पोशाख गोपी वेद डिझाइन्स यांनी डिझाईन केला आहे, तर तिचे स्टायलिंग ए. मुंढे यांनी केले आहे. या दोघांच्या जोडीने अवनीतचा लूक अधिक खुलवला आहे.
तिच्या लूकमध्ये Sajni The Designer यांच्या पारंपरिक दागिन्यांचा समावेश आहे. हे दागिने तिच्या पोशाखाला परिपूर्ण पारंपरिक टच देतात.
अवनीतने तिचे फोटो पोस्ट करत लिहिले “Diwali season is just around the corner!” तिच्या चाहत्यांनी या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अवनीत सांगते की, जरी ती मुंबईत राहते, तरीही तिच्या पंजाबी संस्कारांमुळे तिला भारतीय सण आणि परंपरांशी खूप जोडलेली वाटते.
या दिवाळी लहेंगा लूकद्वारे अवनीतने पुन्हा एकदा सिद्ध केले की ती सणासुदीच्या फॅशनसाठी स्टाइल आयकॉन आहे. तिच्या या पारंपरिक आणि एलिगंट अंदाजाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.