Car Servicing: ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटर की लोकल गॅरेज....कार किंवा बाईक सर्व्हिसिंग कुठे करणे फायदेशीर?

Surabhi Jayashree Jagdish

नवीन गाडीची सर्व्हिसिंग

नवीन गाडी घेतल्यानंतर तिची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कंपनीने दिलेल्या शेड्यूलनुसार, गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यावी. अनेक कंपन्या सुरुवातीच्या काळात ठरावीक सर्व्हिसेस मोफत देतात, त्यामुळे या सुविधेचा फायदा घेता येतो.saam tv

bike maintenance tips | saam tv

फ्री सर्व्हिस

कंपनीकडून मिळणाऱ्या मोफत सर्व्हिसेस संपल्यानंतर गाडीच्या सर्व्हिसिंगचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे काही जण पैसे वाचवण्यासाठी लोकल गॅरेजमध्ये गाडीची सर्व्हिसिंग करून घेतात. तर काही जण कंपनीच्या सर्व्हिस सेंटरलाच प्राधान्य देतात.

new car servicing | saam tv

ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरला प्राधान्य द्या

गाडीची वॉरंटी सुरू असेपर्यंत कंपनीच्या ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंग करून घेणं योग्य आहे. यामुळे कंपनीने ठरवून दिलेल्या सर्व्हिसिंगच्या पद्धतीनुसार गाडीची तपासणी आणि दुरुस्ती करता येते. मात्र, वॉरंटीच्या अटी तपासणं महत्त्वाचं आहे.

car service cost | saam tv

न्यू टेक्नॉलॉजीची गाडी

आजच्या अनेक कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरल्या जातात. अशा गाड्यांची तपासणी करण्यासाठी विशेष उपकरणं आणि संबंधित तंत्रज्ञानाचे ज्ञान असणं आवश्यक असतं. त्यामुळे आधुनिक फीचर्स असलेल्या गाडीसाठी कंपनीच्या ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरचा पर्याय निवडा.

authorised garage benefits | saam tv

गाडीची रीसेल व्हॅल्यू

ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीची सर्व्हिसिंग केल्यास त्याची नोंद कंपनीच्या डिजिटल किंवा लेखी रेकॉर्डमध्ये उपलब्ध होऊ शकते. जुनी गाडी विकताना ही सर्व्हिस हिस्ट्री संभाव्य ग्राहकाला गाडीची वेळोवेळी देखभाल केल्याचे दाखवण्यासाठी उपयोगी ठरतं.

vehicle warranty | saam tv

मेकॅनिकची माहिती

लोकल गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगचा खर्च तुलनेने कमी असू शकतो पण मेकॅनिकचा अनुभव आणि कामाचा दर्जा तपासणं गरजेचं आहे. सर्व्हिसिंग करताना कोणत इंजिन ऑइल, फिल्टर आणि स्पेअर पार्ट्स वापरलं जातंय हे पाहा आणि ते गाडीच्या कंपनीने सांगितलेल्या प्रकारानुसार आहेत याची खात्री करा.

vehicle service history | saam tv

लोकल गॅरेजमध्येही मिळतात विशेष सेवा

आज काही लोकल गॅरेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांसाठी प्रशिक्षित मेकॅनिक आणि आधुनिक उपकरणं उपलब्ध असतात. काही गॅरेज कार, बाईक किंवा विशिष्ट ब्रँडच्या गाड्यांच्या सर्व्हिसिंगमध्ये विशेष काम करतात.

engine oil replacement | saam tv

Car Engine Oil: किती किलोमीटर्सनंतर कारचं इंजिन ऑईल बदललं पाहिजे?

Bike engine oil change interval | saam tv
येथे क्लिक करा