ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कच्च्या टोमॅटोची चटणी ही आंबट गोड आणि तिखट चवीची झटपट तयार होणारी रेसिपी आहे. भाजी, भाकरी आणि भातासोबत ही चटणी खूप छान लागते.
मध्यम कच्चे टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल आणि फोडणीसाठी मोहरी व जिरे, कढिपत्ता आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.
कच्चे टोमॅटो घ्या. ते स्वच्छ धुऊन टोमॅटो लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. टोमॅटो फार कच्चे असतील तर चटणी अधिक चविष्ट आणि आंबट लागते.
एक मोठी कढई घ्या. कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात मोहरी आणि जिरे घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून चांगले हलक्या हातानी परतून घ्या.
आता फोडणीवर कापलेले कच्चे टोमॅटो कढईत टाका. मध्यम आचेवर टोमॅटो 5 ते 7 मिनिटे परतवून घ्या आणि ते मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
टोमॅटो शिजत आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला. थोडी कोथिंबीर घालून टॉमेटोचे मिश्रण नीट मिक्स करुन घ्या.
गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात जाडसर वाटून घ्यावे.
जर तुम्हाला चटणीवर वरून पुन्हा थोडी फोडणी द्यायची असेल तर मोहरी, जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊ शकता.
ही चटणी भाकरी, चपाती आणि वरण भातासोबत खाऊ शकता. तसेच हि चटणी फ्रिजमध्ये 2 दिवस टिकून राहते.