Sakshi Sunil Jadhav
जाड पोहे, नारळ, साखर, पाणी, वेलची पूड इ.
जाड पोहे धुवून नेहमीसारखं पोहे चाळणीत निथळत ठेवा.
पोहे सुके होईपर्यंत नारळाचे दूध काढून घ्या. त्यासाठी ओला नारळ मिक्सरमधून फिरवून घ्या.
पुढे एका खोलगट भांड्यात कपडा ठेवून ते गाळून घ्या.
आता सुकलेले पोहे एका परातीत घ्या. त्यावर नारळाचे दूध ओतून २० मिनिटे भिजवा.
पोहे मुरल्यावर त्यात साखर, वेलची पूड कालवा.
नारळाच्या दुधाचे पोहे चवीला अत्यंत सुरेख असतात. तुम्ही लहान मुलांसाठी हा नाश्ता नक्की ट्राय करू शकता.