Siddhi Hande
कोकणातील स्पेशल डीश म्हणजे कोकम कढी. कोकम कढीलाच सोलकढी म्हणतात.
जेवणानंतर पोटाला थंडावा मिळावा म्हणून सोलकढी पितात. सोलकढी ही खूप चविष्ट असते.
सोलकढी बनवण्यासाठी कोकम जवळपास ३० ते ३५ मिनिटे छान भिजत ठेवा. त्यानंतर त्यातून अर्क काढा.
भिजवलेले कोकम जर तुम्ही हाताने दाबले तर त्याचा संपूर्ण रस निघतो.
यानंतर तुम्हाला नारळाचे दूध काढायचे आहे. सर्वात आधी ओला नारळ फोडा.
यानंतर नारळाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडं पाणी टाका. यानंतर हे गाळून घ्या.
यानंतर तुम्हाला नारळाच्या दुधात कोकमाचा अर्क टाकून छान मिक्स करा.
यामध्ये तुम्हाला चवीनुसार साखर आणि मीठ टाकायचे आहे. त्यात ठेचलेला लसूण आणि मिरची टाका.
यानंतर ही कोकम कढी फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नॉन व्हेज जेवणासोबत सोलकढी पिणे म्हणजे सुख असतं.
Next: रोज काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी अळीवाची खीर