Sambhajinagar Fort : मजबूत तटबंदी अन् भव्य वास्तुकला; संभाजीनगरमधील 'या' किल्ल्याचे वैभव पाहून व्हाल थक्क

Shreya Maskar

छत्रपती संभाजीनगर

वेताळगड किल्ल्याला वेताळवाडी किंवा वेताळवाडीगड असेही म्हणतात. वेताळवाडी किल्ला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात अजिंठा-सातमाळा रांगेत वसलेला डोंगरावरील किल्ला आहे.

Chhatrapati Sambhajinagar | saam tv

वेताळगड किल्ला

वेताळगड किल्ला एकेकाळी एक मोक्याची टेहळणी चौकी आणि संरक्षणात्मक तळ म्हणून वापरला जात असे. आपल्या प्रभावी तटबंदीमुळे आणि तिथून दिसणाऱ्या विहंगम दृश्यांमुळे तो ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना नेहमीच आकर्षित करतो.

Vetalgad Fort | google

किल्ल्याचा आकार

वेताळगड किल्ला त्याच्या २५ फूट उंचीच्या, सुस्थितीत असलेल्या भव्य बेसाल्ट (काळ्या पाषाणाच्या) तटबंदीसाठी आणि २४ बुरुजांसाठी प्रसिद्ध आहे.

Fort Structure | google

किल्ल्याची उंची

किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १९०० फूट (५७९ मीटर) आहे. किल्ल्यावरून हळदा घाट आणि वेताळवाडी धरणाची सुंदर दृश्य पाहायला मिळतात.

Fort | google

किल्ला कधी बांधला?

वेताळवाडी किल्ला किमान १२ व्या ते १४ व्या शतकातील (चालुक्य किंवा यादव काळ) असल्याचे मानले जाते.

When was it built? | google

कसं जाल?

मुंबईहून छत्रपती संभाजीनगरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. स्टेशनपासून वेताळवाडी गावापर्यंत एसटी किंवा रिक्षाने प्रवास करा. किल्ल्याचा ट्रेक वेताळवाडी या पायथ्याच्या गावापासून सुरू होतो.

How to reach? | google

किल्ल्याचा उद्देश

हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्ग आणि जवळच असलेल्या 'हाल्डा घाटा'वर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. वेताळवाडी किल्ला २५.५५ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे.

Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सांगलीत लपलाय १२व्या शतकातील भव्य किल्ला, इतिहासप्रेमींनी एकदा तरी भेट द्याच

Sangli Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...