Shreya Maskar
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. आई-मुलाच्या प्रेमाचं प्रतीक, औरंगाबादची शान 'बीबी का मकबरा'ला आवर्जून भेट द्या.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादला ओळखल जाते.
बीबी का मकबरा औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या आठवणीत बांधला आहे.
बीबी का मकबरा ही वास्तू सतराव्या शतकात बांधण्यास सुरुवात झाली असे म्हटले जाते.
बीबी का मकबरा ही वास्तू 'ताजमहाल' चेअनुकरण आहे. त्यामुळे याला मिनी ताज म्हणून देखील ओळखले जाते.
बीबी का मकबरा मोठ्या बागेच्या मधोमध बांधण्यात आला आहे. येथील भव्य बाग पर्यटकांचे आकर्षण आहे.
भव्य शानदार बीबी का मकबरा गुम्बद संगमरवराचा वापर करून बांधण्यात आला आहे.
औरंगजेबाच्या काळात बीबी का मकबरा बांधण्यासाठी सात लाख रुपये लागले होते.
औरंगाबाद शहरात आल्यावर तुम्ही टॅक्सीद्वारे बीबी का मकबराला भेट देऊ शकतात. औरंगाबादपासून बीबी का मकबरा ४ किमी आहे.