Shreya Maskar
चाळीसगावजवळील सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणजे 'म्हैसमाळ' हे थंड हवेचे ठिकाण होय. हे हिल स्टेशन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये १,०६७ मीटर उंचीवर वसलेले म्हैसमाळ हे 'मराठवाड्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसते. हे ठिकाण हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन ठरेल. हिरवीगार दऱ्याखोऱ्यांचा नजारा पाहून मन शांत होईल.
पावसाळ्यात म्हैसमाळ हिल स्टेशन रानफुलांनी बहरलेले असते. 'सनसेट पॉइंट', 'व्हॅली व्ह्यू' , 'नेकलेस पॉइंट' ही येथील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट्स आहेत.
पावसाळ्यात दाट हिरवळ, धुक्याची चादर, इंद्रधनुष्याचा सुरेख नजारा पाहायला मिळतो. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे नक्की जा.
येथे गिरिजा देवीचे मंदिर , घृष्णेश्वर मंदिर (१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक) , देवगिरी किल्ला ही ठिकाण आहेत. येथे नक्की भेट द्या.
संभाजीनगर स्टेशनला उतरून पुढे तुम्ही रिक्षाने 'म्हैसमाळ' या हिल स्टेशनला पोहचाल. म्हैसमाळपासून ४० किमी अंतरावर हे हिल स्टेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.