Shreya Maskar
महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचे वेगळे सौंदर्य पाहायला मिळते.
औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.
औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर होय.
औरंगाबादला ऐतिहासिक वारसा लाभला असून, येथे अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
औरंगाबाद शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
प्रत्येक दरवाज्याचा एक वेगळा इतिहास आहे. यातील काहीच दरवाजे आता शिल्लक आहेत.
सर्वात प्रसिद्ध आणि जुना निजामाच्या नौखंडा पॅलेस जवळील भडकल गेट आजही पाहायला मिळतो.
पनचक्की , सोनेरी महल, वेरुळ-अजिंठा लेणी ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
औरंगाबादमधील दौलताबाद किल्ला पर्यटनाचे आकर्षण आहे.
अजिंठा- वेरुळ लेणी पाहण्यासाठी देश-परदेशातील लोक येथे गर्दी करतात.