ATM मधून पैसे काढताना 'या' ८ चुका कधीही करू नका; नाहीतर बुडतील तुमचे पैसे

Manasvi Choudhary

आर्थिक फसवणूक

आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार अत्यंत सोपे झाले असले, तरी त्यासोबतच आर्थिक फसवणुकीचे प्रकार दिवसेदिवस वाढताना दिसत आहेत.

Online Fraud

एटीएममधून पैसे काढताना कोणत्या चुका करू नये

एटीएमच्या मशीन्समधू पैसे काढताना होणारी एक छोटीशी चूक तुमचे खाते खाली करू शकते. यासाठी एटीएममधून पैसे काढताना कोणत्या चुका करू नये ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

ATM Scams

कार्ड स्लॉट ओव्हरले स्कॅम

एटीएमच्या मशीन्समध्ये स्कॅमर्स मूळ कार्ड स्लॉटच्या वर अगदी हुबेहूब दिसणारा बनावट प्लास्टिकचा खोटा स्लॉट बसवतात. जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड त्यात टाकता, तेव्हा हे बनावट डिव्हाईस तुमच्या कार्डवरील माहिती कॉपी करू शकतात आणि तुमची फसवणूक करू शकतात.

Card Slot Overlay / Skimming

अशी घ्या काळजी

एटीएम वापरण्यापूर्वी कार्ड स्लॉट हलकासा ओढून किंवा हलवून बघा. तो सैल वाटत असेल किंवा वेगळा दिसत असेल, तर त्या मशीनचा वापर करू नका.

ATM PIN mistakes

छुपे कॅमेरे

एटीएम मशीनच्या कीपॅडच्या वर किंवा आजूबाजूला स्कॅमर्स अत्यंत लहान कॅमेरे लपवून ठेवतात. तुम्ही पिन टाकताच तो या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होऊ शकतात.

Hidden Camera

पिन टाकताना काळजी घ्या

एटीएममशीनमध्ये पीन टाकताना तुमच्या मागे उभा असलेला अनोळखी व्यक्ती मोबाईल कॅमेऱ्याच्या बहाण्याने तुमचा पिन पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळीच लक्ष द्या.

Hidden ATM Camera

अशी घ्या काळजी

एटीएममध्ये पिन टाकताना नेहमी दुसऱ्या हाताने कीपॅड झाकून घ्या.

Hidden ATM Camera

बनावट एटीएम मशीन्स

अनेक ठिकाणी हुबेहूब खऱ्या मशीनसारखी दिसणारी बनावट एटीएम मशीन्स बसवली जातात. यामध्ये तुम्ही कार्ड टाकून पिन टाकल्यानंतर पैसे तर निघत नाहीत, पण तुमच्या कार्डची संपूर्ण माहिती आणि पिन डेटा कॉपी होतो.

Fake ATM Machines

कार्ड ट्रॅपिंग स्ट्रीप

कार्ड ट्रॅपिंग स्ट्रीप या पद्धतीत कार्ड स्लॉटच्या आत एक अतिशय पातळ आणि पारदर्शक प्लास्टिक स्ट्रीप किंवा डिव्हाईस असते. यामुळे तुम्ही कार्ड टाकल्यावर ते मशीनमध्येच अडकून बसते. ग्राहकाला वाटते की मशीन खराब आहे आणि ते बँकेत तक्रार करायला निघून जातात. त्यावेळी स्कॅमर्स तिथे येऊन अडकलेले कार्ड काढून त्याचा गैरवापर करू शकतात.

ATM machine Card Trapping

NEXT: पावसाळ्यात मुलींसाठी शॉर्ट कुर्तीच्या ट्रेंडी आणि युनिक 5 डिझाइन्स

Short Kurti Designs
येथे क्लिक करा...