केवळ चेहराच नाही तर 'या' गोष्टीही ATM च्या कॅमेरात होतात कैद, व्हा सावधान

Surabhi Jayashree Jagdish

एटीएममधील कॅमेरा

एटीएममध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यातून पहिली गोष्ट तुमची ओळख म्हणजेच तुमचा चेहरा टिपला जातो. जेणेकरून गरज पडल्यास तुमची ओळख पटवता येऊ शकते.

रेकॉर्ड

कॅमेरा तुमच्या हाताच्या हालचाली, तुम्ही एटीएममध्ये पिन कसा टाकता, तुम्ही कुठे स्पर्श करता, या सर्व गोष्टी रेकॉर्ड करतो.

एटीएम स्क्रीन

एटीएममध्ये अनेक कॅमेरे बसवलेले असतात जे तुमच्या स्क्रीनवर होणाऱ्या एक्टिव्हीटीची नोंद करतात. यावेळी तुमचा पिन रेकॉर्ड केला जात नाही.

आवाज

काही एटीएम कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सिस्टम देखील असते. जे कोणत्याही वाद किंवा भांडणाच्या वेळी तुमचा आवाज रेकॉर्ड करतात.

वागणूक

तुमचं वर्तन, तुमची देहबोली, घाबरणं किंवा इकडे तिकडे पाहणं हे देखील कॅमेऱ्यात कैद होतं

एटीएममध्ये कॅमेरा का आवश्यक आहे?

एटीएम फसवणूक आणि चोरीच्या घटना वाढत आहेत. कॅमेरा केवळ फसवणूक रोखण्यास मदत करत नाही, तर जर कोणताही वाद निर्माण झाला तर आपण फुटेज पाहून घडलेली घटना पाहू शकतो.

लक्षात ठेवा

पिन टाकताना कीपॅड नेहमी हाताने झाकून ठेवा. त्याचप्रमाणे कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

chhatrapati shivaji maharaj | pintrest
येथे क्लिक करा