Surabhi Jayashree Jagdish
ऑक्टोबर असो किंवा मे-जूनचा कडक उन्हाळा, फ्रिजचं तापमान योग्य ठेवणं महत्त्वाचे आहे. तापमान योग्य असल्यास फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न सुरक्षित ठेवण्यास मदत होतं. त्यामुळे फ्रिजचं तापमान किती ठेवावं हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे.
आजकालच्या स्मार्ट फ्रिजमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी अनेक आधुनिक सुविधा मिळतात. मात्र जुन्या फ्रिजमध्येही तापमान बदलण्यासाठी डायल किंवा वेगळी नियंत्रण व्यवस्था असते. या सेटिंगचा योग्य वापर केल्यास उन्हाळ्यातही फ्रिजमधील अन्न थंड ठेवता येते.
उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान योग्य ठेवणं आवश्यक आहे. यामुळे दूध, भाज्या आणि शिजवलेलं अन्न योग्य प्रकारे थंड ठेवण्यास मदत होते. फ्रिजचं तापमान योग्य असल्यास विजेचा वापर नियंत्रित ठेवण्यासही मदत होऊ शकते.
अनेक फ्रिजमध्ये तापमान बदलण्यासाठी डायल दिलेला असतो. उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान साधारणपणे ३ ते ५ अंश सेल्सिअसदरम्यान ठेवता येते.
फ्रिजमध्ये दूध, फळे, भाज्या आणि शिजवलेलं अन्न ठेवलं जातं. योग्य तापमानामुळे हे पदार्थ थंड राहण्यास आणि लवकर खराब होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. तापमान खूप कमी झाल्यास काही फळे आणि भाज्या गोठू शकतात, त्यामुळे तापमान योग्य मर्यादेत ठेवा.
फ्रिजचा दरवाजा वारंवार किंवा जास्त वेळ उघडा ठेवल्यास थंड हवा बाहेर पडते. त्यामुळे फ्रिजमधील तापमान टिकवण्यासाठी कंप्रेसरला अधिक वेळ काम करावं लागू शकतं.
फ्रिजच्या दरवाजाला असलेल्या रबरला गॅस्केट (Gasket) म्हणतात. हा रबर फाटला असेल किंवा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसेल तर थंड हवा बाहेर जाऊ शकते. त्यामुळे फ्रिजचं कूलिंग नीट होण्यासाठी आणि विजेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी खराब झालेला रबर वेळेवर बदलून घ्या.