New Car Driving Tips: नवीन घेतलेली कार कितीच्या स्पीडने चालवली पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

पहिले १,००० ते १,५०० किमी

नवीन कारच्या सुरुवातीच्या १,००० ते १,५०० किलोमीटरच्या प्रवासाला ‘ब्रेक-इन’ पीरियड म्हणतात. या काळात कारचं इंजिन आणि इतर भाग एकत्र काम करू लागतात. त्यामुळे या सुरुवातीच्या प्रवासात गाडी चालवताना योग्य काळजी घेणं महत्त्वाचं असतं.

New car speed limit | saam tv

नवीन कारचा वेग

नवीन कार चालवताना सुरुवातीला तिचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या मर्यादेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. महामार्गावर रस्ता मोकळा असला तरी सुरुवातीच्या प्रवासात स्पीड मर्यादित ठेवणं गरजेचं आहे.

New car engine care | saam tv

इंजिनचं आरपीएम

कार चालवताना इंजिनच्या आरपीएमकडे म्हणजेच इंजिन एका मिनिटात किती फेऱ्या मारते याकडे लक्ष द्यावं. दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल कारमध्ये आरपीएम २,५०० च्या खाली आणि डिझेल कारमध्ये २,००० च्या आत ठेवावं. प्रत्येक कारच्या इंजिनानुसार मर्यादा वेगळी असू शकते

New car RPM limit | saam tv

अचानक वेग वाढवू नका

नवीन कार मिळाल्यानंतर लगेच जोरात ॲक्सिलरेटर दाबून वेग वाढवणं टाळा. सुरुवातीच्या प्रवासात हळूहळू वेग वाढवावा आणि गरजेनुसार गिअर बदलावा. यामुळे इंजिनवर अचानक जास्त ताण येणार नाही.

Diesel car RPM | saam tv

नवीन टायर

नवीन कारचे टायर आणि ब्रेक पॅड्स यांना रस्त्यावर चांगली पकड मिळण्यासाठी काही काळ लागू शकतो. त्यामुळे सुरुवातीला अचानक ब्रेक लावणं आणि वेगानं वळण घेणं टाळा.

New car maintenance tips | saam tv

क्रूझ कंट्रोलचा वापर टाळा

नवीन कार चालवताना महामार्गावर क्रूझ कंट्रोल सुरू करून एकाच वेगाने सतत प्रवास करणं सुरुवातीला टाळा. त्याऐवजी रस्त्याच्या परिस्थितीनुसार वेग बदलावा आणि गरजेनुसार योग्य गिअर वापरावा.

First 1500 km new car | saam tv

पहिली सर्व्हिसिंग

कार १,००० किलोमीटर चालल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग करून घ्यावी. मात्र प्रत्येक कारची सर्व्हिसिंगची वेळ वेगळी असू शकते.त्यामुळे कंपनीने दिलेल्या सर्व्हिसिंग शेड्यूलनुसार सर्व्हिसिंग करावी.

New car engine protection | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा