High cholesterol: कोलेस्ट्रॉल किती प्रमाणात वाढलं की औषधं सुरु करावी लागतात?

Surabhi Jayashree Jagdish

शरीरात कोलेस्ट्रॉल कुठून येतं?

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी साधारणपणे 200 mg/dL पर्यंत सामान्य मानली जाते. शरीरात कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे काम मुख्यतः लिव्हर म्हणजेच यकृत करतं. याशिवाय मांस, दूध आणि इतर पदार्थांच्या सेवनातूनही शरीराला कोलेस्ट्रॉल मिळतं.

triglycerides | saam tv

शरीरात कोलेस्ट्रॉल कुठून येतं?

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी साधारणपणे 200 mg/dL पर्यंत सामान्य मानली जाते. शरीरात कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे काम मुख्यतः लिव्हर म्हणजेच यकृत करतं. याशिवाय मांस, दूध आणि इतर पदार्थांच्या सेवनातूनही शरीराला कोलेस्ट्रॉल मिळतं.

statins for cholesterol | saam tv

वाढलेलं कोलेस्ट्रॉल धोकादायक का?

रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याचा धोका वाढू शकतो. हे ब्लॉकेज हळूहळू तयार होऊ शकते आणि पुढे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

how statins work | saam tv

स्टॅटिन औषध कसं काम करतं?

स्टॅटिन औषधं यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या एका एन्झाइमचं काम रोखतात. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्याची प्रक्रिया कमी होते. परिणामी रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास या औषधांची मदत होते.

cholesterol lowering medicines | saam tv

औषध बंद केल्यावर कोलेस्ट्रॉल वाढतं का?

स्टॅटिनचा परिणाम औषध घेत असताना दिसून येतो. मात्र औषध बंद केल्यानंतर अनेक वेळा कोलेस्ट्रॉलची पातळी पुन्हा वाढू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टॅटिन सुरू करणं किंवा बंद करणं योग्य नाही.

heart health | saam tv

स्टॅटिनचे दुष्परिणाम कोणते?

स्टॅटिन औषधं अनेक रुग्णांसाठी सुरक्षित असली तरी काही जणांना त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात. यामध्ये स्नायूंमध्ये वेदना, यकृताशी संबंधित समस्या आणि रक्तातील साखरेची पातळी वाढणं यांचा समावेश होऊ शकतो.

artery blockage | saam tv

प्रत्येक रुग्णाला स्टॅटिनची गरज असते का?

प्रत्येक रुग्णाला कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधं देणं गरजेचं नसतं. रुग्णाची एकूण परिस्थिती आणि धमन्यांमधील ब्लॉकेज लक्षात घेऊन औषधोपचाराचा निर्णय घेतला जाऊ शकतो. धमन्यांमधील ब्लॉकेज 40 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणं महत्त्वाचं ठरू शकतं.

statin therapy | saam tv

जीवनशैलीत बदलही गरजेचं

जिथे शक्य असेल तिथे उपचारांमध्ये जीवनशैलीतील बदलांवरही भर दिला पाहिजे. आहार, व्यायाम आणि रोजच्या सवयींमध्ये योग्य बदल केल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे औषधोपचारासोबतच निरोगी जीवनशैलीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

cholesterol management | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

heart disease prevention | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Castor oil benefits | saam tv
येथे क्लिक करा