Cancer risk by age : कोणत्या वयात कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो?

Surabhi Jayashree Jagdish

वयानुसार कॅन्सरचे प्रमाण

बहुतेक कॅन्सरचे रुग्ण ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आढळतात. सुमारे ९०% पेक्षा जास्त प्रकरणे या वयोगटातच दिसून येतात. यामुळे वाढत्या वयाशी कॅन्सरचा थेट संबंध असल्याचं स्पष्ट होतं.

cancer statistics age

निदान होण्याचं सरासरी वय

कॅन्सरचं निदान होण्याचं सरासरी वय साधारण ६५ ते ६६ वर्षे असतं. या वयात शरीरात अनेक बदल घडत असतात. त्यामुळे आजार ओळखला जाण्याची शक्यता जास्त असते.

aging and cancer

५५ ते ६४ वयोगटातील धोका

५५ ते ६४ वर्षांच्या दरम्यान कॅन्सरचा धोका लक्षणीय वाढतो. या काळात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते.

cancer diagnosis age

सर्वाधिक प्रकरणं

कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण ६५ ते ७४ वयोगटात आढळतात. या काळात शरीरातील बदल अधिक स्पष्टपणे दिसतात.

cancer awareness

वाढतं वय

वय वाढत गेलं की शरीरातील पेशी हळूहळू कमजोर होतात. त्यांची दुरुस्तीची क्षमता कमी होते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

cancer prevention tips

इम्यून सिस्टम

वाढत्या वयानुसार शरीराची इम्यून सिस्टम कमकुवत होते. तंबाखू, प्रदूषण आणि इतर हानिकारक घटकांचा दीर्घकालीन परिणाम दिसू लागतो. यामुळे कॅन्सरच्या पेशींना वाढणं सोपं होतं.

cancer risk factors

इतर वयोगटातील परिस्थिती

७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्येही कॅन्सर आढळणं सामान्य आहे. पण २० ते ३० वयोगटात कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. तरीही काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये या वयातही कॅन्सर होऊ शकतो.

cancer symptoms awareness

Chhatrapati Shivaji Maharaj history: अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सैन्यासोबत काय केलं?

येथे क्लिक करा