Shruti Vilas Kadam
रस्त्यावर पडलेले पैसे किंवा नाणी उचलणे काहीजण शुभ मानतात. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार अशा पैशांशी दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा जोडलेली असू शकते.
रस्त्यावर सापडलेली अंगठी, चेन किंवा इतर दागिने घरी आणणे टाळावे. अशा वस्तूंमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
ताईत, काळा धागा, गंडा, रुद्राक्ष किंवा इतर धार्मिक वस्तू रस्त्यावर सापडल्यास त्या उचलू नयेत. त्या एखाद्याच्या वैयक्तिक श्रद्धेशी किंवा धार्मिक विधींशी संबंधित असू शकतात.
रस्त्यावर पडलेले केस किंवा केसांचा गुच्छ उचलणे किंवा त्याला हात लावणे टाळावे. अनेक धार्मिक मान्यतांमध्ये याला अशुभ मानले जाते.
लिंबू-मिरची, नारळ, फुले, हळद-कुंकू किंवा पूजेसाठी वापरलेल्या वस्तू रस्त्यावर पडलेल्या दिसल्यास त्यांना स्पर्श करणे टाळावे.
देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो रस्त्यावर सापडल्यास स्वतः घरी आणण्याऐवजी स्थानिक मंदिर किंवा संबंधित व्यक्तींना माहिती देणे अधिक योग्य ठरते.
सुई, ब्लेड, चाकू किंवा इतर संशयास्पद वस्तू रस्त्यावर सापडल्यास त्या उचलू नका. अशा वस्तूंमुळे दुखापत होण्याबरोबरच सुरक्षेचाही धोका असू शकतो.