Saam Metype
वास्तुशास्त्रानुसार, घरात पितळेचे कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. हे केवळ एक सजावटीचा सामान नसून, ते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते.
शास्त्रानुसार, कासव हा भगवान विष्णूचा अवतार आहे. असे मानले जाते की, घरात कासव असेल तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो.
पितळेचे कासव घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि कुटुंबात शांती आणि समृद्धी येते.
घरात पितळेचे कासव ठेवल्याने घरात समृद्धी येते.
मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर पितळेचे कासव ठेवल्याने त्यांची एकाग्रता वाढते.
पितळ, सोने किंवा चांदीचे कासव नेहमी उत्तर किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावे. क्रिस्टल कासव ईशान्य कोपऱ्यात ठेवावे.
कासवाला नेहमी पाण्याच्या भांड्यात ठेवावे, जेणेकरून त्याचे पाय पाण्यात असतील. पाणी नियमितपणे बदलत रहावे.