Manasvi Choudhary
घरात देवपूजा करतांना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तिची पूजा कधीही करू नये.
देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये.
देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे.
देवांचे आसन, आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे.
शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये.
देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले व्यर्ज होत, मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक, शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी.
तर्जनीने (अंगठ्याजवळच्या बोटाने) देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरुन दुसरा दिवा प्रज्वलित करु नये.
देवाला प्रदक्षिणा, नेहमी विषम संख्येत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे, असे गोल फिरावे.
टीप :
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.