ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार ४ जून रोजी निर्जला एकादशीचा उपवास केला जाणार आहे. निर्जला उपावासाच्या दिवशी दान केल्यास तुम्हाला पुण्य लाभेल.
निर्जला उपवासाच्या व्रता दिवशी लक्षमीदेवींचे पती श्री विक्षणू यांची पूजा केली जाते. निर्जला उपवास केल्यास तुमच्या जीवणात सुख-समृद्धी नांदेल अशी मान्यता आहे.
ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील २४ एकादशीएवढे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. निर्जला एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व पाप दूर होता असं मानले जाते.
निर्जला एकादशीच्या रात्री एका गुलाबी कपड्यावर देवी लक्ष्मीचे प्रिय यंत्र आणि अष्टलक्षमीचे चित्र ठेवून तुमच्या व्यावसायाच्या जागेवर ठेवा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात.
तुमच्या घरात पैसा टिकत नसल्यास निर्जला एकादशीच्या रात्री अष्टलक्षमीदेवीची पूजा करा. पूजा करताना देवीला लाल हार घाला. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारु शकते.
निर्जला एकादशीच्या रात्री पाण्याने भरलेला दक्षिणावर्ती शंख ठेवा. त्यानंतर त्या पाण्याने भगवान श्रीहरींचे अभिषेक करा. हे उपाय केल्यास तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होईल आणि संपत्ती वाढू शकते.
निर्जला एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. झाडाच्या मुळास दुधात मिसळलेले पाणी अर्पण करा, त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक अगरबत्ती आणि दिवे लावून पींपळाच्या झाडाची पूजा करावी. या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही