Shreya Maskar
लोकप्रिय मराठी अभिनेत्री रसिका वाखारकरच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. तिच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरूवात झाली आहे. ग्रहमख विधी, मेहंदी, हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडला आहे.
रसिका वाखारकरला 'अशोक मा .मा ' या लोकप्रिय मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली. यात तिने ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम केले. अलिकडेच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
'अशोक मामा' आधी 'रसिका पिरतीचा वणवा उरी पेटला' या मालिकेत झळकली होती. तिचा होणारा नवरा शुभांकर मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) इंडस्ट्रीमध्ये काम करतो.
रसिकाने ग्रहमख कार्यक्रमाला सुंदर केशरी-गुलाबी रंगाची साडी नेसली होती. पारंपरिक लूकमध्ये रसिका खूपच सुंदर दिसत होती.
हळीमध्ये रसिकाचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. पिवळा-हिरव्या रंगाची साडी, मोकळे केस आणि मिनिमल मेकअप असा थोडा इंडो-वेस्टन लूक तिने केला होता.
मेहंदीला रसिकाने हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. रसिकाच्या हातावर शुभांकरच्या नावाची मेहंदी रंगली आहे. दोघे एकत्र खूपच छान दिसतात.
रसिका आणि शुभांकरने सप्टेंबर 2025 ला थाटामाटात साखरपुडा केला. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता अखेर लग्न बंधनात अडकणार आहेत.
अलिकडेच रसिकाच्या मैत्रिणींनी तिची Bride To Be पार्टी केली. ऑगस्टमध्ये 2025 सोशल मीडियावर पोस्ट करून तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.