Shreya Maskar
यंदा आषाढी एकादशी ६ जुलैला आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील पंढरपूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
चंद्रभागा नदीच्या काठी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे.
पंढरपूरला दरवर्षी लाखो वारकारी पायी वारीला जातात.
महाराष्ट्रात विठ्ठलाची खूप प्रसिद्ध मंदिरे आहेत. जेथे आषाढी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
पुण्यातील पासोड्या विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
कोल्हापुरातील प्रवासी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला भाविकांची गर्दी होते.
मुंबईत वडाळा येथील विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.