Dhanshri Shintre
भारत हा विविध संस्कृती, परंपरा, भाषा आणि लोकांनी समृद्ध असा देश आहे, जिथे प्रत्येक राज्याची ओळख वेगळी आहे.
भारतात विविध भाषांचा समृद्ध वारसा आहे आणि संविधानानुसार देशात एकूण 22 अधिकृत भाषा मान्य आहेत.
या सर्व भाषा भारतीय संविधानातील आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत आणि त्यांना अधिकृत मान्यता मिळाली आहे.
आपल्या देशात एक असे राज्य आहे जिथे लोक विविध भाषा बोलतात आणि भाषिक वैविध्य सर्वाधिक आढळते.
भारतात सर्वाधिक भाषा बोलल्या जाणारे राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश असून येथे अनेक स्थानिक आणि आदिवासी भाषा प्रचलित आहेत.
अरुणाचल प्रदेशात सुमारे ४५ वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, कारण येथे अनेक समाज आणि आदिवासी गट एकत्र नांदतात.
अरुणाचल प्रदेशात स्थानिक भाषांसोबत हिंदी भाषेचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यामुळे ती सर्वत्र समजली जाते.