Dhanshri Shintre
विमान प्रवास हा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील प्रवाशांसाठी आरामदायक आणि वेळ वाचवणारा पर्याय ठरतो.
परंतु विमानप्रवासाचे तिकीट दर बस व रेल्वेप्रवासाच्या तुलनेत अनेक पट अधिक महाग असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
रेल्वेमध्ये ७ वर्षांखालील मुलांचे तिकीट लागत नाही, पण विमानात कोणत्या वयापर्यंत तिकीट लागते का माहिती आहे?
एअरलाइन नियमांनुसार, दोन वर्षांखालील लहान मुलांसाठी विमान प्रवास मोफत प्रवास असून त्यांना तिकीटाचे पैसे भरावे लागत नाहीत.
काही एअरलाइनमध्ये दोन वर्षांखालील मुलांसाठीही तिकिट विकत घ्यावे लागते, कारण त्या कंपन्या प्रत्येक प्रवाशाचे स्वतंत्र नोंद घेतात.
विविध एअरलाइननुसार लहान मुलांच्या तिकिटांचे दर वेगवेगळे असून, ते साधारणपणे ₹१२०० ते ₹२००० दरम्यान असू शकतात.
मुलांसोबत आंतरराष्ट्रीय प्रवास करताना, २ वर्षांखालील मुलांसाठीही तिकिट खरेदी करणे काही एअरलाइनमध्ये बंधनकारक असते.
विमान प्रवासाच्या वेळी, मुलांसोबत त्यांचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे, त्यामुळे सुरक्षा तपासणी सहज पार पडते.