Dhanshri Shintre
रशियाच्या किनाऱ्यावर ८.८ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; जपान ते अमेरिका-मेक्सिकोपर्यंत त्सुनामीचा इशारा देत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुम्हाला माहिती आहे का, त्सुनामी जरी समुद्रात सुरू झाली तरी ती जिथे पोहोचते तिथे ती जीवितहानी घडवू शकते?
त्सुनामी हा जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ "बंदरावर उठणाऱ्या प्रचंड लाटा" असा होत असून तो समुद्री आपत्तीस दर्शवतो.
या प्रचंड लाटा समुद्राखालील भूकंप, ज्वालामुखीचा स्फोट किंवा आत होणाऱ्या भूस्खलनामुळे निर्माण होतात आणि किनाऱ्यावर आदळतात.
जेव्हा समुद्राखाली जोरदार भूकंप होतो, तेव्हा त्यामधून निर्माण झालेली ऊर्जा पाण्यात फैलावते आणि लाटा तयार होतात.
समुद्राखालील हालचालींमुळे पाण्याचा पृष्ठभाग हालतो, मोठ्या प्रमाणात पाणी सरकते आणि त्यातून प्रचंड लाटा तयार होऊन त्सुनामी निर्माण होते.
त्सुनामीचं सर्वात भीतीदायक वैशिष्ट्य म्हणजे ती अचानक येते आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची संधी मिळत नाही.
त्सुनामीपूर्वी समुद्राचे पाणी पाठीमागे सरकते, हे त्याचं पहिलं संकेत असू शकतं, त्यानंतरच जोरदार लाटा किनाऱ्यावर आदळतात.
प्रशांत महासागर भूकंपांमुळे आणि त्यातून होणाऱ्या त्सुनामींमुळे सर्वात जास्त धोका असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे.