Sakshi Sunil Jadhav
2026 संपूर्ण वर्ष मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. त्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. कोणाशीही विनाकारण वाद किंवा शत्रुता टाळणं हिताचं ठरेल.
15 जानेवारी ते 15 मार्चदरम्यान कामे वेगाने पूर्ण होतील. ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारेल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
2025 च्या आर्थिक वर्षानंतर 2026 मध्ये आर्थिक दिलासा मिळेल. खर्च राहतील पण नियंत्रणात असतील. अचानक धनलाभाचे योग एप्रिल ते जूनदरम्यान दिसतात.
फक्त जास्त उत्पन्नासाठी नव्या व्यवसायाची घाई करू नका. जुपिटर आणि राहूचा प्रभाव आकर्षित करेल, पण सध्या संयम आवश्यक आहे. योग्य वेळ आल्यावर व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरेल.
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत संयम ठेवणं गरजेचं आहे. नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी समन्वय ठेवल्याने घरात सुख-शांती वाढेल.
मे महिन्यापर्यंत विवाहित जोडप्यांमधील स्ट्रेस कमी होईल. विवाह करण्यांऱ्यासाठी चांगली संधी आहे. प्रेमसंबंधांत गैरसमज टाळा.
मेष राशीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी चांगली राहील. शिकण्याची क्षमता वाढेल आणि शिक्षक व पालकांचा आदर वाढेल.
एकूण आरोग्य ठीक राहील, मात्र एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान काळजी घ्या. रक्तदाब, व्यसनांवर नियंत्रण ठेवा.