Sakshi Sunil Jadhav
थंड हवेत त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि याचा सर्वात जास्त परिणाम पायांवर दिसतो. पाय काळे पडणे, कोरडे होणे किंवा फाटणे ही समस्या हिवाळ्यात सामान्य आहे. पण योग्य काळजी घेतली तर काही दिवसांतच पाय पुन्हा मऊ, गुळगुळीत आणि चमकदार दिसू शकतात.
दररोज 10–15 मिनिटे कोमट पाण्यात पाय भिजवल्याने मृत त्वचा सॉफ्ट होते आणि कोरडेपणा कमी होतो.
आठवड्यातून 2 वेळा पायांना हलक्या हाताने स्क्रब केल्याने काळेपणा कमी होतो आणि ग्लो येतो.
झोपण्यापूर्वी कोमट नारळाचे तेल पायांना मसाज केल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते आणि फाटलेले टाचेही बऱ्या होतात.
ही नैसर्गिक रेमेडी त्वचा उजळवते, डार्कनेस कमी करते आणि पाय मऊ बनवते.
मॉइश्चरायझर लावल्यानंतर सॉक्स घालून झोपल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो आणि सॉफ्टनेस वाढतो.
टॅनिंग कमी करण्यासाठी आणि पायांवरील काळेपणा दूर करण्यासाठी हा DIY स्क्रब खूप प्रभावी आहे.
अॅलोवेरा त्वचेतील इन्फ्लमेशन कमी करून त्वचेला डीप हायड्रेशन देते.
बाहेरून आल्यावर पाय धुवून पुसून ठेवा. त्याने ओलावा राहिल्यास त्वचा जास्त रफ दिसते.
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी होते. दिवसातून पुरेसे पाणी प्या.