Surabhi Jayashree Jagdish
रात्री झोपताना गरज नसल्यास फोनमधील Wi-Fi बंद करणं योग्य ठरतं. असुरक्षित किंवा पूर्वी सेव्ह केलेल्या नेटवर्कला फोन आपोआप जोडला गेल्यास सायबर हल्ल्याचा धोका वाढू शकतो. नेटवर्कच वापरा आणि सार्वजनिक Wi-Fi शी ऑटो-कनेक्ट होण्याचा पर्याय बंद ठेवा.
ब्लूटूथचा वापर संपल्यानंतर तो बंद करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. सतत ब्लूटूथ सुरू असल्यास अनोळखी डिव्हाइसकडून कनेक्शनचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे गरज नसताना ब्लूटूथ बंद ठेवणं ही चांगली सायबर सुरक्षा सवय आहे.
फोनमध्ये आलेल्या सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करू नका. अनेक अपडेट्समध्ये महत्त्वाचे Security Fixes दूर करणारे पॅच समाविष्ट असतात. वेळेवर अपडेट केल्यास फोन नव्या सायबर धोक्यांपासून अधिक सुरक्षित राहतो.
फोन पूर्ण रात्र चार्जिंगला ठेवणं टाळावं. यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होण्याबरोबरच फोनलाही नुकसान होऊ शकतं. नेहमी दर्जेदार आणि प्रमाणित चार्जरच वापरणं सुरक्षित ठरतं.
सोपा PIN, पॅटर्न किंवा पासवर्ड वापरल्यास फोन कोणतीही व्यक्ती सहज उघडू शकते. मजबूत PIN, पासवर्ड किंवा बायोमेट्रिक लॉक वापरणं अधिक सुरक्षित आहे. यामुळे फोनमधील पर्सनल डेटाचं संरक्षण होतं.
काही अॅप्स बॅकग्राउंडमध्ये इंटरनेट, लोकेशन आणि इतर परमिशन्सचा वापर करत राहतात. त्यामुळे बॅटरीचा वापर वाढण्यासोबतच सिक्युरीटीवर परिणाम होऊ शकतो.
झोपण्यापूर्वी आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक किंवा मेसेजवर विचार न करता क्लिक करणं धोकादायक ठरू शकतं. फिशिंग लिंकद्वारे सायबर गुन्हेगार तुमची बँकिंग माहिती, पासवर्ड किंवा वैयक्तिक डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात.