Manasvi Choudhary
उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हामुळे केस गळती, केसांत कोंडा होणे, केस कोरडे होणे यासमस्या उद्भभवतात.
उन्हाळ्यात केसांना तेल लावताना विशेष काळजी घेतली पाहिजे नाहीतर केस कोरडे होऊन केसगळतीची समस्या आणखी वाढेल
केसांना तेल लावताना योग्य पद्दतीचा वापर करा. चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावल्याने केसांचे नुकसान होते.
केसांना तेल लावल्यानंतर अनेक जण लगेचच केस विंचरतात मात्र यामुळे केस गळण्याची शक्यता अधिक असते.Hair Oiling Mistakes
तेल लावण्यापूर्वीच केस छान विंचरून त्यातील गुंता काढून घ्या. तेल लावल्यानंतर किमान २ ते ३ तास कंगवा लावणे टाळा.
अनेकांचा असा समज असतो की जेवढा जास्त वेळ तेल केसांमध्ये राहील, तेवढा जास्त फायदा होईल. पण तज्ज्ञांच्या मते केसांना २ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवल्यास त्यावर धूळ माती आणि प्रदूषण चिकटून बसते.
केसांना तेल लावल्यानंतर ते १ ते २ तासांत धुवून टाकावे. जर रात्री तेल लावणार असाल, तर सकाळी उठल्यावर लगेच सौम्य शॅम्पूने केस धुवा.
केसांना तेल लावताना ताकदीने किंवा नखांनी घासून मसाज केल्याने केस मजबूत होत नाहीत यामुळे केस तुटतात. केसांना हलक्या हाताने, बोटाने मसाज करत तेल लावा.