भाऊबिजेसाठी मेहंदी काढताय? 'या' झटपट काढणाऱ्या डिझाईन्स पाहाच

Surabhi Jayashree Jagdish

मेहंदी

फुल हँड मेहेंदीचे डिझाइन खूप सुंदर दिसतात. त्यात मोर, फुलांचा नाजूक नमुना तयार करण्यात आला आहे. या डिझाइनमध्ये हाताचा प्रत्येक भाग सुबकपणे भरलेला असल्याने ते आकर्षक आणि पारंपरिक वाटतं.

मेहेंदीचे डिझाइन

मेहेंदीचे हे डिझाइन अतिशय सुंदर दिसत असून त्यात एका बाजूला थ्री-डी फुलांचा नमुना तर दुसऱ्या बाजूला नेट डिझाइनचा वापर केला आहे. या दोन स्टाइल्सच्या मिश्रणाने डिझाइनला आधुनिक आणि आकर्षक लुक मिळतो.

बेल स्टाइलचे मेहेंदी

जर तुम्हाला साधं आणि बेल स्टाइलचे मेहेंदी डिझाइन आवडत असेल तर हे डिझाइन तुमच्यासाठी योग्य आहे. यात फुलं आणि पानांच्या नमुन्यांनी एक सुंदर बेल तयार करण्यात आली आहे.

भाई शब्द

या मेहेंदी डिझाइनमध्ये मध्यभागी गोल बनवून त्यात “भाई” लिहिलंय. गोलाच्या एका बाजूला आणि बोटांवर नेटचा नमुना तर दुसऱ्या बाजूला फुलांचे डिझाइन बनवले आहे.

स्टायलिश लुक

जर लग्नानंतरचा हा तुमचा पहिला भाऊबिजेचा सण असेल तर तुम्ही असे फुल हँड मेहेंदी डिझाइन लावून सण अधिक खास बनवू शकता. हे डिझाइन हात पूर्णपणे भरून पारंपरिक आणि स्टायलिश दोन्ही लुक देतं.

आकर्षक डिझाइन

या डिझाइनमध्ये हातावर गोलाकार सर्कल बनवून त्यात “भाई” लिहिलं आहे. सर्कलच्या आजूबाजूला आणि बोटांवर साधे पण आकर्षक डिझाइन तयार करण्यात आले आहे. तुम्ही हवे असल्यास यात आपल्या भावाचे नावही घालू शकता.

गोल टिक्की

गोल टिक्की मेहेंदीचं डिझाइन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि पारंपरिकतेसोबत आधुनिक लुकही देते. भाईदूजच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारची मेहेंदी घरच्या घरी कमी वेळात लावू शकता.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा