ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा येताच आपल्याला त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चेहऱ्यावर टॅनिंग आणि निस्तेजपणासह, त्वचेच्या ऍलर्जीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
चेहऱ्यावर बर्फाने मसाज करण्याचे काय फायदे आहेत , जाणून घेऊयात.
बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने सूज कमी होते. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होतो.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही बर्फाने मसाज करावा. हे चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करते.
उन्हाळ्यात बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावर टॅनिंग होते. जर तुम्हालाही टॅनिंग असेल तर दररोज झोपण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा.
निस्तेज त्वचेला हायड्रेटेड आणि चमकदार बनवण्यासाठी बर्फाचा वापर करा. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
जर तुम्हाला तुमचा मेकअप जास्त काळ चेहऱ्यावर टिकवायचा असेल, तर दररोज बर्फाने चेहऱ्याला चांगले मसाज करा. यामुळे मेकअप हायलाइट होतो.