Surabhi Jayashree Jagdish
मुलायम आणि सॉफ्ट त्वचा प्रत्येकाला हवी असते. यासाठी आपण विविध प्रकारचे प्रोडक्ट्स देखील वापरतो. मात्र चेहऱ्यावर जर तुम्हाला नॅचरल ग्लो हवा असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपा आणि कमी खर्चिक उपाय सांगणार आहोत.
जुन्या काळापासून तांदळाच्या पाण्याचा वापर हा केस किंवा त्वचेच्या आरोग्यासाठी केला जातो. अशातच आता सोशल मीडियावर एक दावा करण्यात आलाय. या दाव्यामध्ये तांदळाचं पाणी रात्रभर चेहऱ्यावर ठेवल्यास चमत्कारीक फायदे मिळतात असं म्हटलंय.
या पाण्यात स्टार्च, अमिनो अॅसिड्स, व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि टेक्स्चर सुधारतं. अनेकजण हे पाणी त्वचा उजळण्यासाठी, तेलकटपणा कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ करण्यासाठी वापरतात.
हे राईस वॉटर तुम्ही उकळू नका. फक्त तांदूळ भिजवलेलं पाणी वापरा. त्यानंतर कापसाच्या मदतीने राइस वॉटर चेहऱ्यावर टोनरसारखं लावा. ते पूर्णपणे सुकू दिलं आणि त्यावर कोणतीही क्रीम न लावता रात्रभर तसंच ठेवा.
रात्र राइस वॉटर चेहऱ्यावर रात्रभर लावून ठेवल्यास त्वचा स्मूथ वाटू शकते. यावेळी तुमचा चेहरा थोडा उजळ वाटू शकतो. नाकाजवळचे पोर्स कमी दिसू लागतील. त्यामुळे जर तुम्हाला इरिटेशन होत असेल तर ते देखील कमी होईल.
सकाळी चेहरा पाण्याने धुतल्यानंतर टाईटनेस कमी होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्वचा फ्रेश आणि स्वच्छ वाटू शखते. काही तासांपर्यंत चेहऱ्यावर ग्लो कायम राहतो. मात्र त्वचेला ओलावा टिकवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा राइस वॉटर वापरणं सुरक्षित ठरू शकतं. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, नेहमी ताजं राइस वॉटरच वापरा. योग्य पद्धतीने वापरल्यास हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.