ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयामुळे, सूर्यप्रकाशामुळे आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात.
वयाच्या चाळीशीनंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. या कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक तेलांचा वापर करु शकता.
चाळीशीनंतर महिलांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी दररोज लॅव्हेंडर तेलाचा वापर करावा.यामध्ये अँटी- एजिंग गुणधर्म आहेत, जे फाइन लाइन्स कमी करतात.
चेहऱ्यासाठी नारळाचे तेल हे एक रामबाण उपाय आहे, जे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करते. तसेच त्वचेला हायड्रेट देखील ठेवते.
रोझहिप ऑइलमध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवते आणि स्कीन टाइट करते. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
वाढत्या वयानुसार, चेहऱ्यावर डार्क सर्कल्स आणि फाइन लाइन्स दिसू लागतात. यासाठी दररोज चेहऱ्यावर बदाम तेल लावा.