ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी कोरफड प्रभावी आहे. कोरफडीतील अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म पावसाळ्यात स्कॅल्पला होणारी खाज किंवा चिडचिड दूर करण्यास मदत करतात.
पावसाळ्यात केस निर्जीव होणे आणि गळणे हे सामान्य आहे. परंतु काही घरगुती उपायाने तुम्ही पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेऊ शकता.
कोरफडीमध्ये अनेक सक्रिय घटक आणि मिनरल्स असतात जे केस मजबूत करतात. तसेच फॅटी अॅसिड आणि अमीनो अॅसिड व्यतिरिक्त, यात व्हिटॅमिन ए, बी१२, सी आणि ई असतात.
कोरफडीतील अँटीफंगल गुणधर्म बुरशीसारख्या कोंडा निर्माण करणाऱ्या घटकांशी लढण्यास मदत करतात.
कोरफड केसांना मजबूत करते, ज्यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होते.
तुम्ही कोरफडीचे तेल आणि नारळाचे दूध मिक्स करा. आणि ते केसांना आणि टाळूला लावा, ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.
कोरफड केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून रक्ताभिसरण सुधारते, जे केसांच्या वाढीस उपयुक्त ठरते.