ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरफडीच्या जेलचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. खाण्यापासून ते त्वचा आणि केसांसाठी एलोवेराचा वापर केला जातो.
एलोवेरामध्ये असलेले व्हिटॅमिन्स, अमीनो अॅसिड्स आणि मिनरल्स त्वचेपासून ते केसांसाठी फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात एलोवेरा जेलचा कसा वापर करावा, जाणून घ्या.
रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या जेलने चेहऱ्यावर लावून मसाज करा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चमकदार होतो.
उन्हाळ्यात घामामुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. एलोवेरामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम कमी करण्यास आणि त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दररोज एलोवेरा जेल लावल्याने टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावल्याने चेहरा हायड्रेट राहतो.