Shruti Vilas Kadam
सफरचंदामध्ये फायबर (घनांशयुक्त तंतू) भरपूर प्रमाणात असतो, जो पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन) टाळतो.
रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे त्वचा आणि यकृत (लिव्हर) आरोग्य सुधारते.
सफरचंदातील नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) शरीराला ऊर्जा देते पण रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ करत नाही. मधुमेह असणाऱ्यांसाठीही फायदेशीर असतो.
सफरचंदामधील अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
सफरचंद खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त खाण्याची सवय टाळली जाते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास सफरचंद नैसर्गिक ऊर्जा देते, मानसिक थकवा कमी करते आणि दिवसभर उत्साही ठेवते.
सफरचंद चावून खाल्ल्याने लाळेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि दात स्वच्छ व मजबूत राहतात.