ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण एटीएममधून पैसे काढत असतात.
मात्र अनेकदा एटीएममधून पैसे काढल्यानंतर फाटलेल्या नोटा मिळतात,तर काय करावे तुम्हाला माहिती आहे का?
मुळात एटीएममधून मिळालेली फाटलेली नोट आपल्याला सहज बदलता येतात.
आरबीआयने एटीएम फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी एक नियमही तयार केलेला आहे.
फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी सुरुवातीस अर्ज प्रक्रिया पु्र्ण करावी लागते त्यानंतर पैसे काढण्याची तारीख,वेळ सर्व तपशील बँकेला सांगावा लागतो.
आरबीयाच्या नियमानुसार एका व्यक्तीला साधारण २० च नोटा बदलता येऊ शकतात.
जर तुम्हाला फाटलेल्या नोटा मिळाल्यास फक्त पाच हजारांपर्यंत नोटा बदलून मिळतात.