Shruti Vilas Kadam
शांत आणि स्वच्छ ठिकाणी पद्मासन किंवा सुखासनात बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीतून हळूहळू श्वास घ्या. आता अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. त्याच उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन डाव्या नाकपुडीतून सोडा. ही प्रक्रिया 5 ते 10 मिनिटे नियमित करा.
अनुलोम-विलोम प्राणायाम नियमित केल्याने मन शांत राहते. तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होते.
या प्राणायामामुळे श्वसनक्रिया अधिक प्रभावी होते. फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढून श्वसनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
मेंदूपर्यंत अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचल्याने एकाग्रता सुधारते. विद्यार्थ्यांसाठी आणि मानसिक काम करणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर ठरू शकते.
नियमित अनुलोम-विलोम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी जाणवतो.
शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने आणि तणाव कमी झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते.
अनुलोम-विलोम मन आणि शरीराला रिलॅक्स करण्याचे काम करते. त्यामुळे निद्रानाशाची समस्या कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
हा प्राणायाम श्वसन आणि रक्ताभिसरण यामध्ये संतुलन राखण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास हातभार लागू शकतो.