ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्राचे जाणते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा केला जातो.
अण्णाभाऊंनी सामाजिक विषयावर अनेक कथा, कादंबऱ्या आणि पोवाडे लिहीले. पण त्यांनी लिहिलेली पहिली राजकिय छक्कड म्हणजे "माझी मैना गावाकडं राहिली" तुम्ही ऐकलीच असेल. छक्कड हा लावणीतील एक गीत प्रकार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही छक्कड आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात घर करून आहे.
मुळत: या छकडीतून त्यांनी आपलं गाव, कुटुंब सोडून शहरात नोकरीसाठी आलेल्या कामगारांच्या मनाची होणारी तगमग मांडली आहे असे वाटते. पण या छकडीचा खरा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या संदर्भातून पाहिल्यास, ही छक्कड खरी राजकीय अर्थाने लिहिण्यात आली होती.
मुंबतील फाऊंटन आणि बेळगाव येथे झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे मुंबई शहर तर महाराष्ट्रात सामिल झाले. पण बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी हा मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्राबाहेरच राहीला.
याचीच सल लोकशाहीर अण्णाभाऊंच्या मनाला होती. आणि यातूनच "माझी मैना गावाकडं राहिली" या गीताचा जन्म झाला.
या गीतातील मैना म्हणजे आजही महाराष्ट्रात न सामिल होऊ शकलेले मराठी भाषिक प्रदेश. आणि राघू किंवा पोपट म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा मुंबई शहर.
या गीताचा हा संदर्भ लक्षात घेऊन तुम्ही हे गीत ऐकले तर, गीतातील ओळींमागचा राजकीय अर्थ तुम्हाला लगेच कळेल. आणि गीत ऐकताना एक वेगळाच अनुभव येईल.