Ruchika Jadhav
अननस आणि त्यापासून बनलेला शिरा सर्वांनाच आवडतो. लहान मुलं फार आवडीने हा शिरा खातात.
पायनॅपल शिरा बनवताना सर्वात आधी रवा छान भाजून घ्या.
त्यानंतर ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्या आणि ते देखील थोडे शॅलो फ्राय करा.
योग्य प्रमाणात साखर यामध्ये मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील साखर टाकावी.
सर्वात महत्वाचे म्हणजे अननस. तुम्ही अननस बारिक कुसकरून घ्या.
शिरा बनत असतानाच साखरेबरोबर अननस त्यात मिक्स करा.
तयार झाला तुमचा मस्त खमंग अननस शिरा. हा शिरा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात फूड कलर देखील मिक्स करू शकता.