Shruti Vilas Kadam
सुके अंजीर स्वच्छ धुऊन साधारण २-३ तास कोमट पाण्यात भिजत ठेवा. मऊ झाल्यानंतर पाणी काढून अंजीर बारीक वाटून घ्या.
बदाम, काजू आणि पिस्ते बारीक चिरून घ्या. आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
कढईत थोडे तूप गरम करून त्यात अंजीरची पेस्ट घाला. मंद आचेवर सतत ढवळत काही मिनिटे शिजवा.
अंजीरचे मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ते घाला. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
मिश्रणात वेलची पूड घालून चांगले मिसळा. अंजीर नैसर्गिक गोड असल्याने अतिरिक्त साखरेची गरज भासणार नाही.
ताटाला किंवा ट्रेला थोडे तूप लावून त्यावर तयार मिश्रण पसरवा. चमच्याच्या मदतीने समान जाडीचा थर द्या.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे कापा. वरून पिस्त्याचे काप लावून स्वादिष्ट अंजीर बर्फी सर्व्ह करा.