Shruti Vilas Kadam
‘भाभी जी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे यांनी नुकताच काळ्या रंगातील जॉर्जेट साडीत फोटोशूट केला असून, त्यांच्या या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
शुभांगीने परिधान केलेली हलकी, फ्लोइंग ब्लॅक जॉर्जेट साडी साधी असली तरी तिचा लूक अत्यंत ग्रेसफुल आणि एलिगंट दिसतो.
काळ्या साडीला तिने ब्लॅक आणि बेज स्ट्राइप्स असलेला स्टायलिश ब्लाउज परिधान केला आहे. या कॉम्बिनेशनमुळे संपूर्ण आउटफिटला ट्रेंडी फील मिळतो.
साडीच्या बॉर्डरवर हलका गुलाबी रंग आणि सूक्ष्म डिझाइन असल्याने ती साधेपणातही आकर्षक दिसते.
शुभांगीने कोणतेही हेवी ज्वेलरी न घालता मिनिमल लूक निवडला आहे. खुल्या केसांसह आणि हलक्या मेकअपने तिचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे.
ही साडी ऑफिस इव्हेंट, पार्टी किंवा पारंपरिक समारंभासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. साधेपणातही स्टाइलिश दिसण्यासाठी ही परफेक्ट ड्रेपिंग स्टाइल आहे.
शुभांगी अत्रेचा हा साडी लूक पारंपरिकतेसोबत आधुनिकता जपणाऱ्या फॅशनप्रेमींसाठी इन्स्पिरेशन ठरतोय. त्यांच्या या साडीतील आत्मविश्वासपूर्ण अंदाजाने फॅन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.