Siddhi Hande
आंगणेवाडीची जत्रा खूप प्रसिद्ध आहे. कोकणातल्या या गावात यात्रेला हजारो लोक जातात.
आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
भराडी देवीचा कौल घेऊनच या जत्रेचा मूहूर्त ठरवला जातो. कोणत्याही तिथीवर ही यात्रा अवलंबून नसते.
आंगणेवाडी नक्की आहे तरी कुठे? तिथे जायचे कसं याबाबत तुम्हाला माहितीये का?
आंगणेवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात मसुरे गावाजवळ वसले आहे.
आंगणेवाडी गाव भराडी देवीच्या मंदिरासाठी ओळखले जाते. भराडी देवी नवसाला पावते, असं म्हणतात.
कोकणातील लाखो भाविक दरवर्षी आंगणेवाडी देवीच्या यात्रेला जातात.
तुम्ही बस, ट्रेन किंवा प्रायव्हेट वाहन किंवा विमानाने आंगणेवाडीला जाऊ शकतात.
विमानाने गेला की तुम्हाला गोव्याला जावे लागेल. त्यानंतर रस्ते मार्गाने आंगणेवाडीला जावे लागेल.
रेल्वेने गेलात तर कणकवली किंवा ओरोस रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल. त्यानंतर कारने किंवा बसने पुढे जावे लागेल.
बसने गेल्यास मालवण शहरापासून १४ किमी तर कणकवलीपासून ३३ किमी अंतरावर हे आंगणेवाडी गाव वसले आहे.