Chetan Bodke
आधी अनन्या पांडे आणि आता तिचा चुलत भाऊ अहान पांडे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण अहानला बॉलिवूडमध्ये करण जोहर नाही तर एक वेगळाच दिग्दर्शक त्याला संधी देणार आहे.
अहान पांडेला यशराज फिल्म्स लाँच करणार असून गेल्या अनेक दिवसांपासून स्वत: आदित्य चोप्रा अहान पांडेवर विशेष लक्ष देऊन आहेत.
यशराज फिल्म्सने आजवर बॉलिवूडला अनेक नवनवे चेहरे दिले आहेत. त्या कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
'आशिकी २'चे दिग्दर्शक मोहित सुरी अहान पांडेला एका खास भूमिकेसाठी कास्ट करणार आहेत.
गेल्या ५ वर्षांपासून अहान पांडे यशराज फिल्म्ससोबत जोडला गेला आहे. त्याच्या पदार्पणाकरिता चाहते खूपच उत्सुक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहान पांडेला आगामी चित्रपटामध्ये एका रोमँटिक हिरोचे पात्र मिळण्याची शक्यता आहे.
आहान पांडे हा चंकी पांडेचा धाकटा भाऊ चिक्की पांडे म्हणजेच शरद पांडेचा मुलगा आहे. अनन्यानंतर आहान सुद्धा लवकरच डेब्यू करेल.
आहान अनेकदा अनन्याच्या फोटोंमध्ये दिसतो, त्याच्या फोटोंचीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते.
आहानच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते. आहान अभिनय क्षेत्रात नसला तरी त्याचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे.