Chetan Bodke
अभिषेक बच्चन हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
फार कमी दमदार भूमिका साकारत अभिषेकने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.
आज अभिनेता अभिषेक बच्चनचा ४८ वा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त टॉप १० चित्रपटाची यादी पाहणार आहोत.
टॉप १० चित्रपटांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर २००७ मध्ये रिलीज झालेला 'गुरू' चित्रपट आहे.
दुसऱ्या क्रमांकावर बिग बी आणि अमिताभ यांचा क्राईम आणि ॲक्शन असलेला 'सरकार' चित्रपट आहे.
मल्टीस्टारर 'ब्लफमास्टर' चित्रपट टॉप १० यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क्राईम, ॲक्शन आणि थ्रिलर यांचे मिश्रण असलेल्या 'धूम २' चित्रपटातूनही अभिषेकला खूपच प्रसिद्धी मिळाली.
त्यासोबतच वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या 'पा' चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
क्राईम, ॲक्शन आणि थ्रिलर यांचे मिश्रण असलेला 'धूम' चित्रपट टॉप १० यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
कॉमेडी, क्राईम आणि ड्रामा असलेल्या 'बंटी और बब्ली' चित्रपटातून अभिषेक बच्चनला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.
गेल्या वर्षी रिलीज झालेला 'घूमर' चित्रपटानेही अभिषेकच्या प्रसिद्धीमध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे.
मल्टीस्टारर आणि ॲक्शन ड्रामाचे मिश्रण असलेल्या 'युवा' चित्रपटाचा टॉप १० यादीमध्ये समावेश झाला आहे.
अभिषेकचा कॉमेडीपट असलेला 'दसवी' चित्रपटाचाही टॉप १० यादीमध्ये समावेश झाला.