साम टिव्ही ब्युरो
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जगभरात चर्चा आहे.
अकहर आज अनंत आणि राधिका लग्नबंधनात अडकले आहेत.
नवरीच्या पोशाखात राधिका मर्चंट खूपच सुंदर दिसत होती.
राधिकाचा ब्रायडल लूक समोर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
फॅशन डिझायनर रिया कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर राधिका मर्चंटचे काही फोटो शेअर केले आहेत.
लग्नात वधू राधिका मर्चंटने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला गुजराती लाल आणि पांढऱ्या रंगाचा 'पानेटर' लेहेंगा परिधान केला होता.
राधिकाच्या लग्नातील लेहेंग्यावर लाल रंगात उत्कृष्ट नक्षीकाम, साधा आणि जरदोजी वर्क केलेलं दिसत आहे.
स्टोन, सिक्वीन्स, कॉपर टिक्की आणि रेड सिल्कने बनवलेला हा लेहेंगा खूपच सुंदर दिसतो.