Shreya Maskar
अमृतसरी कुलचा बनवण्यासाठी मैदा, दही, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तूप, मीठ, उकडलेले बटाटे, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, कांदा, धणे पावडर, मिरच्या, लाल तिखट आणि गरम मसाला इत्यादी साहित्य लागते.
अमृतसरी कुलचा बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा, तेल, पाणी आणि मीठ टाकून एक कणीक मळून घ्या. तयार पीठ काही मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
एका बाऊलमध्ये दही, तूप, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. मळलेल्या पीठावर थोडे तूप लावून कापडाने झाकून ठेवा.
दुसऱ्या बाऊलमध्ये उकडलेल्या बटाटे, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, मीठ, चाट मसाला, जिरे-धणे पावडर आणि लाल मिरच्या घालून मिक्स करा.
आता मैद्याच्या पीठाची पोळी लाटून यावर दहीचे मिश्रण पसरवा आणि उकडलेल्या बटाटे मिश्रण घालून गोल लाटून घ्या.
कांदा-चिंचेची चटणीसोबत अमृतसरी कुलच्याचा आस्वाद घ्या. अगदी ढाब्यावर मिळतो तसा कुलचा तयाल झाला आहे.
कांदा-चिंचेची चटणी बनवण्यासाठी बाउलमध्ये भिजवलेल्या चिंचेचा गर, चिरलेला कांदा, धणे, हिरव्या मिरच्या, काळे मीठ , जिरे पावडर आणि चाट मसाला टाकून मिक्स करा. चवदार चटणी तयार झाली.