Dhanshri Shintre
उन्हाळ्यात अनेकजण नारळपाणी पसंत करतात, कारण ते शरीर हायड्रेट ठेवते आणि आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे पुरवते.
नारळपाण्यात सब्जा मिसळून पिल्यास ते शरीरासाठी अधिक पौष्टिक ठरते आणि दुहेरी आरोग्य फायदे मिळतात.
नारळपाणी आणि सब्जा शरीराला ऊर्जा देतात आणि वजन कमी करण्यास मदत करणारे नैसर्गिक पेय म्हणून उपयुक्त ठरतात.
नारळपाण्यात सब्जा मिसळून रोज प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाविरोधात लढण्यास मदत होते.
नारळपाणी आणि सब्जा कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसने समृद्ध असून हाडे मजबूत करण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
दररोज नारळपाण्यात सब्जा मिसळून पिल्यास गॅस, बद्धकोष्ठता, अपचन आणि आम्लता यांसारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
सब्जा फायबर आणि प्रथिनेयुक्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि जास्त खाण्याची सवय नियंत्रित करण्यास मदत होते.